Tuesday, October 11, 2016

जादू

ही रात्र, हे चांदणं पुन्हा नसेल, ही जादू नसेल..
झाडांवरुन निथळणा-या सावल्या
बहार निघून जात आहे
पुन्हा परतून येणारे नाहीयेत हे काफ़िले बहारके, एकदाच पुकारतील तुला ते जायच्या आधी आणि मग कायमचे दिसेनासे होतील..
ही जादू अनुभवण्याचा हा एकच क्षण.. तो चिरकाल नाहीच

देव आनंद गातो आहे आर्तपणे, कदाचित स्वत:करताच. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट जुवेल.


जे हवं ते मिळण्याचा आणि त्यातली जादू हरवून जाण्याचा क्षण हा अनेकदा एकच असतो..
ही नात्यातली मर्यादा.

1 comment:

  1. देव आनंद आणि त्याच्या जादूने लागणारे वेड... सुंदर!

    ReplyDelete